Chandrapur Post : Amruta Fadnavis यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला वर्षभरासाठी केलं तडीपार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याविषयी समाजमाध्यमात आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्याला पोलिसांनी चंद्रपूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याची कार्यवाही केलीये... चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी शहरात हा प्रकार घडला आहे.  खेमचंद गरपल्लीवार असं तरुणाचं नाव आहे. खेमदेवविरोधात आणखी अनेक गंभीर गुन्ह्यांची यापूर्वी नोंद असल्याचं समोर आलंय... अश्लील शिवीगाळ करून लोकांना धमकावणे, जमिनी बळकावणे, लोकांची फसवणूक करणे, विनयभंग असे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे.. खेमदेव गरपल्लीवार गोंडपिपरी परिसरात दादागिरी करून लोकांमध्ये दहशत माजवण्याचा काम करत होता... त्यामुळे स्थानिक पोलिसांनी त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे पाठवला होता... त्याच प्रस्तावावर योग्य निर्णय घेऊन उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी खेमदेव गरपल्लीवार याला एक वर्षासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून तडीपार करण्याचा निर्णय घेतला आहे..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola