Nashik Unhygienic Quarantine Center | नाशकातील क्वॉरंटाईन सेंटरमध्ये डासांचं साम्राज्य,जागोजागी कचरा
नाशिक जिल्हा आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणणारा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. नाशिकच्या बागलाण तालुक्यात अजमेर सौंदाणे इथल्या क्वॉरन्टाईन सेंटरमध्ये पावसामुळे पाण्याचं डबकं साचलंय. इथं डासांचं साम्राज्य, जागोजागी कचऱ्याचे ढिग साचल्यानं दुर्गंधी पसरलीय. सेंटरमधील खुर्च्या, बेड्स अक्षरश: धूळ खात पडलेत इथल्या रुग्णांना जेवणंही निकृष्ट मिळत असल्याचा आरोप रुग्णांकडून केला जातोय. या व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ उडाली आहे.