Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांनी उत्पन्नाची माहिती लपवली? पुणे सत्र न्यायालयाचे चौकशीचे आदेश
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या निवडणुक अर्जासोबत जोडलेल्या अफिडेवीटमधे माहिती दडवल्याचा आरोप करणारी याचिका पुणे सत्र न्यायालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यावर निर्णय देताना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दीलेत. चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवताना जे एफिडेवीट सादर केलं होतं त्यामधे ते ज्या दोन कंपन्यांचे संचालक आहेत त्या कंपन्यांपासून मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती लपवल्याचा आणि कोल्हापूरमधील राजारामपुरी पोलिस स्टेशनमधे त्यांच्या विरोधात दाखल असलेल्या गुन्ह्याबद्दलची माहिती दडवल्याचा आरोप याचिकेत करण्यात आलाय. चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्र एग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेट कॉर्पोरेशन लिमिटेड आणि महाराष्ट्र स्टेट फार्मींग कॉर्पोरेशन लिमिटेड या दोन कंपन्यांचे संचालक आहेत. परंतु त्या कंपन्यांपासून त्यांना किती उत्पन्न मिळते आहे याची माहिती त्यांनी दिली नसल्याचा आरोप याचिकाकर्ते अभिषेक हरदास यांनी केलाय.