Chandrakant Patil | मोहिम पूर्ण होईपर्यंत कुठेही जाणार नाही, चंद्रकांत पाटील यांचं स्पष्टीकरण
Continues below advertisement
पुणे : "मी पुन्हा जाईन म्हणणाऱ्यांना पुणेकरांनी बोलावलंच कुठे होतं?" असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. "देवेंद्रजी मी कोल्हापूरला परत जाणार आहे," असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी काल (25 डिसेंबर) पुण्यातील अटल संस्कृती गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात केलं होतं. त्यानंतर राजकीय वर्तुळात त्यांच्या या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. त्यावर प्रतिक्रिया विचारली असता अजित पवारांनी हा टोला लगावला.
Continues below advertisement