Eknath Khadse ED Notice | ईडीची नोटीस आल्याची खुद्द राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंची माहिती
जळगाव : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी ईडीची नोटीस मिळाल्याचं त्यांनी पहिल्यांदाच मान्य केलं आहे. 30 डिसेंबरला हजर राहण्याचा ईडीची समन्स मला मिळाली आहे, असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे. या आधीही माझ्या या घटनेची चौकशी झाली आहे. त्यांना जे सहकार्य लागले ते मी पुरवले आहे. आता देखील सहकार्य करेल, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं.