मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकारच्या अपयशामुळे संपूर्ण राज्य वेठीला - चंद्रकांत पाटील
मुंबई : राज्यातील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही. हे सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नाही, हे आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या घडामोडींमुळे दिसले. राज्य सरकारच्या अशा भूमिकेमुळे केवळ मराठा समाज नाही तर संपूर्ण महाराष्ट्र वेठीला धरला गेला आहे. महाविकास आघाडी सरकारचा आपण निषेध करतो व मराठा आरक्षण हा विषय गांभिर्याने घेण्याची मागणी करतो, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
Tags :
Maratha Aarakshan Chandrakant Patil New Delhi State Government Maratha Reservation In Maharashtra Supreme Court SEBC Act Maratha Reservation LIVE Maratha Reservation