Jammu Kashmir Land Purchase| जम्मू-काश्मीरमध्ये कुणालाही जमीन खरेदी करता येणार,केंद्राचा मोठा निर्णय
नवी दिल्ली : देशातील कोणताही नागरिक आता जम्मू-काश्मीरमध्ये जमीन खरेदी करू शकणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्यासाठी आता तेथील नागरिक असण्याची गरज नाही. मात्र तुम्हाला ही जमीन फक्त उद्योग उभारणीसाठी खरेदी करता येऊ शकते अशी अट ठेवण्यात आली आहे. उद्योगांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने निर्णय घेतला असून आजपासून हा नियम लागू झाला आहे.