Jejuri Champashashthi Utsav | खंडेरायाच्या गडावर चंपाषष्ठी उत्सवाला प्रारंभ, 6 दिवस महोत्सव साजरा होणार
Continues below advertisement
जेजुरीच्या खंडेरायाची चंपाषष्ठी सोहळ्यास आजपासून सुरुवात झालीये.. हा सोहळा मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या काळात संपन्न होणार आहे. 15 डिसेंबर ते 20 डिसेंबर या काळात जेजुरीमध्ये खंडोबा देवाची घटस्थापना केली जाणार आहे.मणी आणि मल्य या असुरांच्या संहारासाठी मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा या दिवशी शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेतला. सहा दिवस मणी आणि मल्य या असुरांशी युद्ध केलं आणि त्यांचा संहार केला. अशी आख्यायिका आहे. तेव्हापासून या सहा दिवस देवाची घटस्थापना केली जाते. आजपासून सोहळ्याला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. 12 ते 14 डिसेंबर या काळात जेजुरीच्या यात्रेनिमित्त जमाव बंदी लागू करण्यात आली. त्यामुळे भाविकांना खंडेरायचे दर्शन करता आले नाही. आता मंदिर भाविकांसाठी खुल करण्यात आलं आहे.
Continues below advertisement