अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक औरंगाबादेत दाखल, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
Continues below advertisement
अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचं पथक मराठवाड्यात दाखल झालंय. या पथकात सहा जणांचा समावेश आहे. या सहापैकी 3 अधिकाऱ्यांचं एक पथक औरंगाबाद तर तीन अधिकाऱ्यांच दुसरे पथक उस्मानाबाद जिल्ह्यातील पीक आणि शेतीच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. .उद्या सकाळी 9 वाजता औरंगाबाद तालुक्यातील निपाणी, पिंपळगाव पैठण तालुक्यातील गाजीपुर, निलजगाव, शेकटा आणि गंगापूर तालुक्यातील मुरमी, ढोरेगाव वरखेड या गावातील शेतीची नुकसानीची पाहणी हे करणार आहे. तर दुसरे एक पथक उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहे. केशेगाव, पाटोदा लोहारा तालुक्यातील सास्तुर, राजेगाव काकरंबा,अपसिंगा आणि कात्री या गाव शिवाराची पाहणी करणार आहेत.
Continues below advertisement