University Exams | केंद्र सरकार म्हणतंय शाळा काॅलेज बंद मग परीक्षांचा आग्रह का? मंत्री उदय सामंत यांचा सवाल

Continues below advertisement
मुंबई : विद्यापीठ अंतिम वर्षाच्या परिक्षेबाबत काल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलुगुरूंशी चर्चा केल्यानंतर आज पुन्हा एकदा कुलगुरू समितीची बैठक सुरु आहे. यामध्ये परीक्षा कधी घेण्यात याव्यात ? त्या कशा पद्धतीने घेतल्या जाव्यात ? या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली जात असून या बैठकीतील निर्णयाचा अहवाल तयार करून राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय परिक्षेबाबत घेतला जाणार आहे. साधारणपणे उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत परिक्षेबाबत महत्वाचा निर्णय जाहीर करू, असं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram