Buldhana Majha Impact: शिक्षणाधिकाऱ्यांकडून माझाच्या बातमीची दखल, शाळा पूर्ववत सुरु ABP Majha

Continues below advertisement

देशाच्या राष्ट्रपती पदावर आदिवासी समाजाच्या महिलेला विराजमान होण्याचा बहुमान मिळाला खरा...! मात्र बुलढाण्याच्या आदिवासी भागात मुलांना साधा शिक्षणाचा हक्क मिळत नाहीये. हेच आदिवासी भागातील शिक्षणाचं भीषण वास्तव  एबीपी माझानं काल दाखवलं होतं. तर बुलढाण्यातील ही आदिवासी भागातील शिवणी शाळा आज पूर्ववत सुरू झाली आहे. तब्बल १४ दिवसांनी शाळेत  दोन शिक्षक पाठविण्यात आलेत.. शिक्षक शाळेवर येतच नसल्याने गेल्या अनेक दिवसांपासून शाळा  बंद  होती.  माझाच्या बातमीची दखल घेत शिक्षणाधिकाऱ्यांनी तात्काळ शाळेवर शिक्षकांची नियुक्ती केली आहे. गावकऱ्यांच्या समस्येची दखल एबीपी माझाने घेतल्यामुळे गावकऱ्यांनी एबीपी माझाचे आभार मानलेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram