Sindkhedraja Idol : उत्खनन पूर्ण! सिंदखेडराजा येथे सापडलेल्या मूर्तीचं पूर्ण रूप समोर
Sindkhedraja Idol : उत्खनन पूर्ण! सिंदखेडराजा येथे सापडलेल्या मूर्तीचं पूर्ण रूप समोर राजे लाखोजी जाधव यांच्या समाधी समोर मूर्तीच उत्खनन पूर्ण. सिंदखेडराजा येथे सापडलेल्या मूर्तीच पूर्ण रूप आल समोर. इतिहासातील अतिशय सुंदर पूर्ण मूर्ती आली समोर. सिंदखेड राजा येथे राजे लखोजी जाधव यांच्या समाधीसमोर सुरू असलेल्या उत्खननात शेषशाही भगवान विष्णू व लक्ष्मी यांची अतिशय सुंदर मूर्ती सापडली आहे .या मूर्तीच्या भोवतालचं उत्खनन आता पूर्ण झालं असून मूर्तीचे पूर्ण रूप आता समोर आलेल आहे. अतिशय रेखीव आणि सुंदर ही मूर्ती असून सहा फूट लांब व तीन फूट उंच अशी ही मूर्ती आहे. या मूर्तीत समुद्रमंथनाचा सुद्धा देखावा दाखवण्यात आलेला आहे. ही मूर्ती अतिशय जड असल्याने आता फक्त ही मूर्ती बाहेर काढण्याचं काम बाकी आहे. काल सायंकाळी या परिसराचे आ. डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी सुद्धा ही मूर्ती बघण्यासाठी या ठिकाणी भेट दिली. शेष नागावर विश्राम अवस्थेतील लक्ष्मी सेवारत विष्णू मूर्ती हातामध्ये शंख, चक्र, गडा, पद्म, नाभितून उत्पन्न कमळ आणि त्यावर ब्रह्मदेव विराजमान असं काहीसं स्वरूप आहे. या मूर्तीच्या प्रभावळ भागात सुंदर, कोरीव समुद्रमंथनाचा देखावा, वासुकी नाग मूर्तीच्या बैठकीवर सुंदर असं नक्षीकाम केलं आहे. उत्खनना दरम्यान सापडलेली ही मूर्ती साधारणपणे अकराव्या शतकातील असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ही सुरेख आणि रेखीव मूर्ती आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात सुंदर मूर्ती असल्याचे बोलले जात आहे.