'समृद्धी'वर मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांना 'पूजा' करत श्रद्धांजली, जादू टोणाअंतर्गत गुन्हा दाखल
समृद्धी महामार्गावर १ जुलै रोजी खाजगी बसच्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना काल अपघातस्थळीच श्रद्धांजली वाहण्यात आली. स्वामी समर्थ मंडळाकडून शेकडो भक्तांकडून अपघात स्थळी श्रद्धांजली वाहण्यात आली. मात्र त्याचे व्हिडिओ व्हायरल करून...." पूजा केल्याने अपघात होणार नसल्याचा दावा करणाऱ्या " निलेश आढाव या तरुणाविरुद्ध सिंदखेड राजा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जादूटोणा विरोधी कायद्याच्या कलम २ आणि ३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.