Buldana Lok Sabha 2024 : संजय गायकवाड उमेदवारी अर्ज मागे घेतील : प्रतापराव जाधव : ABP Majha
Continues below advertisement
बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिंदे गटासमोर नवा पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेच्या पहिल्या यादीत विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांचं नाव आहे. मात्र त्यांचं नाव जाहीर होण्याआधीच आमदार संजय गायकवाड यांनी तडकाफडकी जाऊन उमेदवारी अर्ज भरला. गायकवाड आपला अर्ज मागे घेतील असं जाधव म्हणाले आहेत, मात्र त्याबाबत खुद्द गायकवाड यांनी शब्द दिलेला नाही. कारण जेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारलं, तेव्हा ते बघू एवढंच म्हणाले.
Continues below advertisement