Gajanan Maharaj : गजानन महाराज यांचा 146 वा प्रगटदिन सोहळा, 700 हुन अधिक दिंड्या शेगावात दाखल
Continues below advertisement
संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांचा 146 वा प्रगटदिन सोहळा शेगावात मोठ्या थाटामाटात पार पडला. या सोहळ्याला 2 ते 3 लाख भाविकांनी हजेरी लावली. 23 फेब्रुवारीपासूनच या सोहळ्याला सुरुवात झाली होती. त्यामुळे गजानन महाराजांच्या भक्तांच्या गर्दीने शेगाव फुलून गेले होते. देशभरातून लाखो भाविक तसेच शेकडो दिंड्या गजानन गण गण घणात बोतेचा नामघोष करत शेगावात दाखल झाल्या होत्या. दरम्यान, आज गजानन महराजांच्या पालखीची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. हत्ती आणि घोडे या मिरवणुकीचं विशेष आकर्षण होतं. यावेळी भक्तांमध्ये उत्साह ओसंडून वाहात होता तसेच शेगावात चैतन्याचं वातावरण होतं.
Continues below advertisement