Buldhana Dahi Handi :बुलढाण्याच्या चिखलीत दहीहंडी कार्यक्रमात जोरदार हाणामारी, हंडी फोडण्यावरुन वाद
बुलढाण्यातील चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमात काल जोरदार हाणामारी झाली. दहीहंडीच्या कार्यक्रमात मध्यरात्रीपर्यंत धुमशान सुरु होतं. या हाणामारीत काही गोविंदाही जखमी झालेत. दहीहंडी आधी कुणी फोडायची यावरून दोन मंडळांत वाद सुरु झाला आणि तो इतका विकोपाला गेला की मध्यरात्रीपर्यंत हाणामारी झाली. पोलिसांचा बंदोबस्तही अपुरा पडला. अखेर दहीहंडी न फोडताच कार्यक्रम संपला.