Maharashtra Rain : बुलडाण्यात अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका, शेतकऱ्यांचं नुकसान

Continues below advertisement

काही महिन्यांपूर्वीच अवकाळी पावसानं उसंत घेतली होती.. मार्च महिन्यात झालेल्या पावसाच्या तडाख्यामधून राज्यातला शेतकरी आता कुठे सावरु पाहत होता..  अशातच आता राज्यात पुन्हा एकदा पावसाचा अंदाज वर्तवला जातोय. उद्या,परवा आणि शनिवारी या तीन दिवसांत मध्य महाराष्ट्र,मराठवाड्यासह विदर्भाच्या काही भागांत पावसाचा अंदाज हावामान विभागाकडून वर्तवला जातोय. तसंच कोकणातही मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त केला जातोय. या काळात वाऱ्याचा वेगही वाढण्याची शक्यता आहे...तर राज्यातल्या काही भागांत पावसाच्या हलक्या सरींचीही शक्यता वर्तवण्यात आलीये. तर मुंबईत पारा वाढला नसला तरी उकाड्यात मात्र कमालीची वाढ झालीय. तसंच  राज्यात निर्माण झालेल्या पावसाळी वातावरणाचा परिणाम मुंबईवरही झालाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram