Devendra Fadnavis On Buldana Accident : अपघात होणार नाही याबाबत स्मार्ट सिस्टीम बसवत आहोत


नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या खासगी बसचा भीषण अपघात झालाय. या बसमधील २५ जणांचा होरपळून मृत्यू झालाय तर ८ प्रवासी सुखरूप आहेत. विदर्भ ट्रॅव्हल्सची ही बस होती. अपघात समृद्धी महामार्गावर बुलढाण्यातील सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा गावाजवळ झालाय. नागपूरहून निघालेली ही बस रात्री साडे नऊ वाजता यवतमाळहून पुण्याकडे निघाली होती. मध्यरात्री दीड वाजता हा अपघात झाला. बस पहिल्यांदा लोखंडी पोलला धडकली, त्यानंतर रस्ता दुभाजकाला धडकली आणि उलटली. त्यानंतर लगेचच बसने पेट घेतला. बसचा दरवाजा खालच्या बाजूला गेल्याने कोणालाही बाहेर येता आलं नाही. तरीही काही प्रवासी बसची काच फोडून बाहेर आल्याने वाचले. जखमींवर सिंदखेडराजामधील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बसमधील बहुंताश प्रवासी हे नागपूर, वर्धा आणि यवतमाळचे होते. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola