Shegaon Corona Restriction : सलग सुट्ट्यांमुळे तीर्थक्षेत्र गजबजली, कोरोनामुळे चिंताही वाढली

Shegaon Corona Restriction : सलग सुट्ट्यांमुळे तीर्थक्षेत्र गजबजली, कोरोनामुळे चिंताही वाढली

विक एन्ड आणि नाताळच्या सुट्या तसच नवं वर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण तीर्थक्षेत्राला जाणे पसंद करतात....शेगाव येथील संत गजानन महाराज समाधीच दर्शन घेण्यासाठी सुद्धा आज पासून मोठी गर्दी बघायला मिळत आहे. याठिकाणी आगामी कोरोनाच्या लाटेच्या शक्यतेने मंदिर प्रशासनाने अजून तरी कुठले निर्णय घेतले नसले तरी मात्र भाविक स्वतः खबरदारी घेतानाच चित्र आहे. अनेक भाविक हे मास्क वापरत आहेत व कोरोना नियमांचं पालन करताना सुद्धा दिसत आहे. या आठवड्यात लाखो भाविक शेगावात दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे , त्यामुळे मंदिर प्रशासन आगामी काळात काही निर्णय घेत का..? याकडे लक्ष लागून आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola