Buldhana Bus Accident : प्रत्येक जीव महत्वाचा, असे अपघात होऊन चालणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Continues below advertisement

समृद्धी महामार्गावर आतापर्यंतची सर्वात भीषण दुर्घटना घडलीय. बुलढाण्याजवळील पिंपळखुटा गावाजवळ खासगी बसचा भीषण अपघात होऊन २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झालाय. या भीषण अपघातातून सात प्रवासी वाचलेत. नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसचा मध्यरात्री १ वाजून २६ मिनिटांनी अपघात झाला. ही बस संध्याकाळी ४ वाजता नागपूरहून निघाली होती. आणि रात्री रात्री साडे नऊ वाजता यवतमाळला थांबून बस पुण्याकडे निघाली होती. बस पहिल्यांदा लोखंडी खांबाला धडकली, त्यानंतर रस्ता दुभाजकावर धडकून उलटली. त्यानंतर काही क्षणांतच बसने पेट घेतला. बसचा दरवाजा खालच्या बाजूला गेल्याने प्रवाशांना तातडीने बाहेर पडणे शक्य झाले नाही. त्यात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. तर काही प्रवाशांना प्रवासी बसची काच फोडून बाहेर पडण्यात यश आलं. समृद्धी महामार्गावरील या भीषण अपघातामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून समृद्धीच्या कामाविषयी शंका व्यक्त केल्या जात आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram