Buldhana Shuttle Train : खामगाव - जलंब शटल सेवा सुरू; विद्यार्थी, शेतकरी, कामगारांना दिलासा
Buldhana Shuttle Train : खामगाव - जलंब शटल सेवा सुरू; विद्यार्थी, शेतकरी, कामगारांना दिलासा तब्बल 175 वर्षापासून सुरू असलेली खामगाव जलंब जंक्शन रेल्वे शटल सेवा पुन्हा एकदा पूर्ववत झाली आहे.... खामगाव ही पूर्वीपासूनच चांदीची व कापसाची बाजारपेठ आहे व त्यामुळे खामगाव येथून संपूर्ण देशभरात कापसाच्या गाठी वाहतूक करण्यासाठी इंग्रजांनी खामगाव येथून कलकत्ता - मुंबई या मेन रेल्वेलाईनला जोडणारी 14 किलोमीटरची शटल सेवा सुरू केली होती. पूर्वी ही शटल सेवा कोळशावर चालणाऱ्या इंजिन वर सुरू होती... त्यानंतर काही काळानंतर याचं रूपांतर रेल्वे बस मध्ये करण्यात आलं मात्र आता खामगाव रेल्वे स्थानकाचा विस्तारीकरण केल्यानंतर व विद्युतीकरण केल्यानंतर कोरोना काळापासून बंद असलेली ही शटल सेवा काल रात्रीपासून सुरू करण्यात आली. या शटल सेवेचे जलंब ते खामगाव अशा दिवसातून चार फेऱ्या होणार आहेत आणि त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या शेतकरी, कामगार ,विद्यार्थी व प्रवाशांची मोठी सोय झाली आहे....