Buldhana Samruddhi Expressway : समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात, 6 जखमी ABP Majha

Buldhana Samruddhi Expressway : समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात, 6 जखमी ABP Majha

नागपूर हुन औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या राही ट्रॅव्हल्स च्या खाजगी लक्झरी बसला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात.
बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा नजीकच्या असोला फाटा गावाजवळ अपघात. अपघातात २० प्रवासी जखमी. अपघाता नंतर बस समृद्धी महामार्गाच्या मध्यभागी पलटली. अपघाताग्रस्त बस मधून प्रवासी बाहेर निघून महामार्गाच्या बाजूला जात असताना मागून येणाऱ्या भरधाव ट्रक ने दोन प्रवाशांना चिरडले ,  एक प्रवासी जागीच ठार तर एक प्रवासी गंभीर जखमी.
जखमींना देऊळगाव राजा व जालना येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
पोलीस व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झालेल्या असून अपघातग्रस्त बस महामार्गाच्या बाजूला करण्याचं काम सुरू.
हा अपघात रात्री 4.30 च्या सुमारास घडला. बस क्र. MH 20 EL4999.
अपडेट - सहा प्रवासी गंभीर जखमी झालेले असून सहाही प्रवाशांना जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola