Buldhana Flood Updates : बुलढाण्याच्या कातरगावात पुरात अडकलेल्यांना वाचवण्यात यश
Continues below advertisement
यवतमाळ आणि बुलढाण्यात तुफान पाऊस सुरु आहे...सतत पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी, नाल्यांना पूर आला, तर अनेक सखल भाग पाण्याखाली गेलेत.. पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात अनंतवाडी गावाला पुराने वेढलंय.. गावातील ४५ जण पुरात अडकलेत. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी सध्या यवतमाळमध्ये हेलिकॉप्टरद्वारे बचावकार्य सुरु आहे... तर बुलढाण्यातही कातरगावात पुरात अडकलेल्या दीडशे जणांना वाचवण्यात यश आलंय.. सध्या कातरगावाला पुराचा वेढा पाहायला मिळतोय.. गावकऱ्यांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलंय..
Continues below advertisement