Buldhana Crime : बुलढाण्यात गावठी पिस्टलसह 17 जिवंत काडतुस जप्त
Buldhana Crime : बुलढाण्यात गावठी पिस्टलसह 17 जिवंत काडतुस जप्त बुलढाण्यात चार गावठी पिस्टलासह सतरा जिवंत काडतुस जप्त करण्यात आलीत.. मध्यप्रदेशच्या सीमेवर बुलढाणा पोलिसांनी कारवाई केलीय.. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आलीय.त्यांच्याकडून ४ पिस्टलसह १७ जिवंत काडतुसे, दुचाकी वाहन, मोबाईल असा २ लाख १७ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या चौघांची कसून चौकशी सध्या सुरू आहे..लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. सोनाळा पोलिसांनी वसाडी ते हाडियामल या गवादरम्यान ही कारवाई केली.