Buldhana : बुलढाण्यात जादूटोण्याच्या संशयातून बहिणीला संपवलं ABP Majha
धक्कादायक बातमी आहे बुलढाण्यातून. बुलढाण्यातील चांडोळ गावात एका ६० वर्षीय महिलेची तिच्या सख्ख्या भावानेच हत्या केलीय. अंधश्रद्धेतून भावानं बहिणीला संपल्याचा पोलिसांना संशय आहे. आपल्या मुलाला जादू आणि करणी करून बहिणीनं संपवलं असा भावाला संशय होता. त्यामुळे त्यानं बहिणीची हत्या केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. बहिणीची हत्या करून तिचा मृतदेह विहिरीत फेकला. धनाबाई सुभाष गोमलाडू असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. या महिलेच्या भावासह चार आरोपींना पोलिसांनी अटक केलीय.