Solapur | स्मार्ट सिटीअंतर्गत खोदकाम सुरू सोलापूरतल्या मुरारजी पेठ येथे दुमजली इमारतीची भिंत कोसळली
सोलापूरतल्या मुरारजी पेठ येथे दुमजली इमारतीची भिंत कोसळली, स्मार्ट सिटीअंतर्गत विकास काम सुरू होतं आणि त्यासाठी खोदकाम सुरू असताना भिंत कोसळल्याची माहिती मिळाली आहे. या इमारतीत अडकलेल्या तीन मजुरांना शासकीय रुग्णालयात हलवलं गेलं आहे, तर आणखी काही मजूर अडकल्याचा अंदाज आहे. घटनास्थळी पोलीस, स्थानिक नगरसेवक, अग्निशमन दल दाखल झाले आहेत.