'प्रजापिता'च्या संचालिका दादी हृदयमोहिनी कालवश, प्रजापिता ब्रह्मकुमारी परिवारावर शोककळा
प्रजापिता बह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या मुख्य संचालिका दादी हृदयमोहिनी यांचे गुरुवारी मुंबईतील सैफी रुग्णालयात निधन झाले. त्या ९३ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर १३ मार्चला सकाळी माऊंट अबू येथील ज्ञान सरोवर अकादमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.