BMC on SSR AIIMS Report | सुशांतने आत्महत्या केली सिद्ध, बीएमसी आरोग्य समिती अध्यक्षांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : अभिनेता सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली नाही. हे आत्महत्येचं प्रकरण आहे, असं एम्सच्या डॉक्टरांच्या पॅनलने सीबीआयला आपला अहवाल सोपावत म्हटलं आहे. एम्सचे डॉ. सुधीर गुप्ता यांनी यासंदर्भात माहिती दिली. सुशांतचे कुटुंबिय आणि त्यांचे वकील सुशांतची आत्महत्या नसून त्यांची हत्या झाल्याचा दावा करत होते. मात्र एम्सच्या पॅनलने सुशांतचे कुटुंबिय आणि त्याच्या वकीलांनी केलेला दावा फेटाळून लावला आहे. दरम्यान, सुशांतचे कुटुंबिय आणि वकील सतत सुशांतला विष देण्यात आलं होतं आणि गळा दाबून मारण्यात आलं होतं, असं म्हणत होते. एम्सच्या डॉक्टरांनी सोपावलेल्या अहवालामुळे सीबीआयच्या तपासाची दिशा बदलणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola