BMC Employee Antigen Test | मुंबई महापालिकेच्या फ्रंटलाईन कोविड वॉरियर्सची अॅंटिजन टेस्ट
Continues below advertisement
कोविड 19 (कोरोना) विषाणू संसर्ग रोखण्यासाठी मागील चार महिन्यांपासून संपूर्ण शासकीय, निम-शासकीय यंत्रणांसह सर्वजण एकत्रित प्रयत्न करत आहेत. विशेषतः यामध्ये सर्वात आघाडीवर असलेल्या यंत्रणेतील कर्मचाऱ्यांची (फ्रन्टलाईन वॉरियर्स) कोरोना चाचणी करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. यामध्ये प्रत्यक्ष क्षेत्रावर कार्यरत आरोग्य, स्वच्छता, मलनिःसारण यासह विविध खात्यातील कोविड 19 विषयक कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची तसेच बंदोबस्तात कार्यरत पोलिस कर्मचाऱ्यांचीदेखील 'अॅंटिजन कीट’ द्वारे चाचणी केली जात आहे.
Continues below advertisement