कोरोनामुळे रक्तदान शिबिरांमध्ये घट, मुंबईत रक्ताचा तुटवडा; पाच-सहा दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक

Continues below advertisement

मुंबई : मुंबईकरानो सावधान... तुम्हाला जर तात्काळ रक्ताची गरज भासली तर ते मिळेलच याची शक्यता कमी आहे. कारण सध्याच्या घडीला मुंबईत पुढील 5 ते 6 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध आहे. कोरोनामुळे गेल्या 5 महिन्यांपासून रक्तदान शिबिरात कमालीची घट झाल्याने मुंबईत रक्तसाठा कमी झालेला आहे.

'रक्तदान श्रेष्ठ दान' असं आपण म्हणत असतो. या वाक्याला प्रेरीत होऊन आपण रक्तदानही करत असतो. मात्र गेल्या 5 महिन्यापासून मुंबईत रक्तदान शिबिरांमध्ये कमालीची घट झाली असून त्याचा परिणाम आता मुंबईवर होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. गेल्या 5 महिन्यात कोरोनामुळे रक्तदान शिबिरं न झाल्याने पुढील 5 ते 6 दिवस रक्तसाठा पुरु शकणार आहे. आणि ही बाब अत्यंत काळजीची आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram