Arjun Khotkar | घंटानाद आंदोलनानं घंटा फरक पडत नाही अर्जुन खोतकरांचं भाजपच्या आंदोलनावर टीकास्त्र
जालना : भाजपच्या या घंटानाद आंदोलनानं घंटा फरक पडत नाही, असं म्हणत शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलंय. मंदिरं खुली करण्यासाठी आज भाजपच्या वतीनं राज्यभरात घंटानाद आंदोलन करण्यात आलं. त्या पार्श्वभूमीवर खोतकर बोलत होते. मंदिरं खुली करणं ही आमचीही भावना आहे. मात्र, प्रथम प्राधान्य हे आरोग्याला द्यावं लागेल. तसेच जबाबदार राज्यकर्ते जनतेचं हित लक्षात घेतात. मात्र, भाजपला मंदिरांशी काही देणंघेणं नसून हे फक्त सरकारच्या द्वेषभावनेतून होत असल्याचा आरोपही खोतकर यांनी केला.