Pankaja Munde | पंकजा समर्थक आमदारांना काय वाटत ? | ABP Majha

भाजपच्या नेत्या पकंजा मुंडे यांनी पुन्हा एकदा संघर्षाची हाक दिलीय. बेईमानी आपल्या रक्तात नाही. आपण पक्ष सोडणार नाही, पण पक्षाला आत्मचिंतनाची गरज असल्याचंही पंकजा मुंडे म्हणाल्यात. आपण कुठल्याही पदासाठी दबावाचा वापर केला नाही. जर कुणाला तसं वाटत असेल तर कोअर कमिटीतून आपण बाहेर पडत असल्याची घोषणाही पंकजांनी केलाय. त्यामुळं पक्षांतर्गत दबावगट निर्माण करण्याचा प्रयत्न पकंजा आणि एकनाथ खडसेंनी केल्याचं पाहायला मिळतंय. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर काल मेळावा पार पडला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola