Milk Protest | दूध दरवाढीसाठी भाजपचा मुंबईसह राज्यभरात महाएल्गार

महाराष्ट्रातील दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या गाईच्या दुधाला प्रति लिटर 10 रुपये अनुदान द्या, तसेच दूध भुकटीला 50 रुपयांचे प्रति किलो अनुदान द्यावे यासाठी भाजपच्या वतीने राज्यभर दूध आंदोलन करण्यात आलं. राज्यातून मोठ्या प्रमाणात दुधाच्या गाड्या येत असल्याने या विरोधात भाजपने आंदोलन केले. जिल्ह्याध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आंदोलनात गावावरून आलेल्या गाड्या अडवण्यात आल्या. वाशी येथील वारणा , गोकुळ दुधाच्या गाड्या आडवून आंदोलन करण्यात आले. काही ठिकाणी दुधाची नासाडी झाली तर काही ठिकाणी गरिबांना दूध देण्यात आलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola