Nagpur Manas Agro Blast | नागपूरच्या मानस अॅग्रो कंपनीत बायोडायजेस्टरचा ब्लास्ट, पाच जणांचा मृत्यू
नागपूरमध्ये मानस अॅग्रो या कंपनीत एक मोठा ब्लास्ट झाला, बायोडायजेस्टरचा ब्लास्ट झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटात पाच कर्मचाऱ्यांनी आपले प्राण गमावलेत. या बायोडायजेस्टरजवळ वेंडिंगचं काम सुरू होतं, एका कंपनीला या कामासाठी कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं होतं आणि ते कर्मचारी इथे काम करत होते. काम सुरू असतानाच हा ब्लास्ट झाल्याने जागीच पाच जणांचा मृत्यू झाला.