BJP State President | रवींद्र चव्हाण यांची उद्या महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होणार
रवींद्र चव्हाण यांची उद्या भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजप नेत्यांच्या उपस्थितीत रवींद्र चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. संपूर्ण पक्षाने रवींद्र चव्हाण यांना पाठिंबा दर्शवला असून, इतर कुणीही प्रदेशाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेला नाही.