Maharashtra Chief Secretary | राजेश कुमार मीणा यांनी मुख्य सचिव पदाचा पदभार स्वीकारला
महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून राजेश कुमार मीणा यांनी पदभार स्वीकारला. सुजाता सौनिक यांच्या सेवानिवृत्तीनंतर मीणा यांची नियुक्ती झाली. मीणा यांनी सांगितले, 'या महान राज्याच्या सर्व सेक्टर्समध्ये प्रगती आणि गतिमानता आणण्यासाठी, कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि गुड गव्हर्नन्सच्या माध्यमातून विकसित महाराष्ट्राकडे घेऊन जाण्यासाठी मी प्रत्येक क्षणी कार्यरत राहीन.' सौनिक यांनी निवृत्तीनंतर म्हटले, 'कर्मयोगीला सेवानिवृत्ती नसते, आता आपण पुढे वेगळ्या प्रकारचे कार्य करू.'