Shirdi BJP Protest | शिर्डीत भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचं आंदोलन, साई मंदिर खुलं करण्यासाठी भाजप आक्रमक
Continues below advertisement
दार उघड देवा आता... अशी हाक देत भाजप अध्यात्मिक आघाडीकडून आज राज्यव्यापी आंदोलन करण्यात येतंय. राज्य सरकारनं सोशल डिस्टन्सिंग आणि सर्व ती खबरदारी घेऊन सरकारनं मंदिरं खुली करावीत अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येतेय. शिर्डीच्या साई मंदिरासमोरही भाजपच्या आध्यात्मिक आघाडीकडून आंदोलन करण्यात आलं. भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले शिर्डीत ८ साधू-महंतांसोबत लाक्षणिक उपोषण करताहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी शिर्डीत या आंदोलकांची भेट घेतली.
Continues below advertisement
Tags :
Saibaba Temple Temples Maharashtra Lockdown Shirdi Temple Shirdi Saibaba Shirdi Lockdown BJP Temple Reopen