Chandrakant Patil | राज्यात भाजपशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही : चंद्रकांत पाटील | ABP Majha
भाजपला 105 जागा मिळाल्या आहेत. अपक्षांच्या पाठिंब्याने भाजपकडे असलेल्या आमदारांची संख्या 119 आहे. यामुळे राज्यात भाजपशिवाय सरकार स्थापन होऊच शकत नाही असे सांगत भाजपचेच सरकार पुन्हा येईल असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. पक्षाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी हा विश्वास व्यक्त केला असल्याचे चंद्रकात पाटील यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.