Bihar Result Counting : मैथिली ठाकूर, तेजस्वी यादव आघाडीवर, कोण पिछाडीवर?
Bihar Result Counting : मैथिली ठाकूर, तेजस्वी यादव आघाडीवर, कोण पिछाडीवर?
बिहारमध्ये बहुमतासाठी जादूई संख्या 122 आहे. राज्यात एकूण 243 विधानसभा जागा आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी (११ नोव्हेंबर) संपले. 20 जिल्ह्यांमधील 122 जागांवर मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 68.42 टक्के मतदान झाले. राज्यातील पहिल्या टप्प्यातील मतदान 6 नोव्हेंबर रोजी झाले, ज्यामध्ये 18 जिल्ह्यांमधील 121 जागांचा समावेश होता. पहिल्या टप्प्यात सरासरी 65.08 टक्के मतदान झाले
एक्झिट पोलनुसार, भाजप प्रणित एनडीएला दीडशेहून जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. एनडीएला 145 ते 163 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर महागठबंधनला 76 ते 95 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने 74 जागा, जेडीयूने 43 आरजेडीने 75 , एलजेपीने 1, एआयएमआयएमने 5, काँग्रेसने 19, सीपीएमने 2, सीपीआयने 2 आणि बसपाने 1 जागा जिंकल्या होत्या.