Bihar Elections 2020 Guidelines : बिहार निवडणुकीसाठी 'या' आहेत गाईडलाईन्स
Continues below advertisement
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाकडून दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये पत्रकार परिषदेत बिहार विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. विधानसभेच्या 243 जागांसाठी बिहारमध्ये तीन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पहिला टप्प्यात 28 ऑक्टोबरला, दुसऱ्या टप्प्यात 3 नोव्हेंबर तर तिसऱ्या टप्प्यात सात नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 10 नोव्हेंबर रोजी या मतदानाचा निकाल घोषित होणार आहे. बिहार विधानसभेचा कार्यकाळ 29 नोव्हेंबरला संपतो आहे. त्यामुळं नवीन सरकार हा कार्यकाळ संपण्याआधी स्थापन होणं गरजेचं आहे.
असे असणार बिहार विधानसभा निवडणुकीचे तीन टप्पे
पहिला टप्पा- 16 जिल्ह्यातील 71 जागा (28 ऑक्टोबर)
दुसरा टप्पा- 17 जिल्ह्यातील 94 जागा (3 नोव्हेंबर)
तिसरा टप्पा- 15 जिल्ह्यातील 78 जागा ( 7 नोव्हेंबर)
मतमोजणी आणि निकाल - 10 नोव्हेंबर
Continues below advertisement
Tags :
Bihar Election 2020 Dates Bihar Assembly Elections Bihar Election Dates Election Commission Of India Bihar Election Bihar Elections Bihar Elections 2020