SSR Case | सुशांतप्रकरणी संजय राऊत, आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा, शिवसेना CBIला घाबरतेय - भाजप

Continues below advertisement
मुंबई पोलीस सुशांत सिंह राजपूत प्रकरणात योग्यरितीनं निष्पक्ष तपास करत आहेत. त्यामुळे बिहार सरकारच्या सांगण्यावरून याप्रकरणी सीबीआयनं गुन्हा दाखल करण्याची किंवा या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची गरज नाही. सध्याच्या परिस्थितीत सीबीआयनं दाखल केलेली एफआयआर 'झिरो एफआयआर' मध्ये रूपांतरीत करून ती मुंबईतील वांद्रे पोलीस स्थानकांत हस्तांतरीत करावी, अशी भूमिका राज्य सरकारच्यावतीनं सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट करण्यात आली आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणी आधी राज्य सरकारच्यावतीनं कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आत्तापर्यंत 56 लोकांचे जबाब नोंदवले असून सुशांतच्या मृत्यूमागची कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram