Ganeshotsav 2020 | पुण्याच्या दगडूशेठ गणपती ट्रस्टचा गणेशोत्सव यंदा मंदिरातच, 127 वर्षांची परंपरा पहिल्यांदाच खंडित

Continues below advertisement

दरवर्षी होणाऱ्या वैभवशाली गणेशोत्सवाचा डामदौल रद्द करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा गणेशोत्सव मुख्य मंदिरामध्येच करण्याचा निर्णय श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने घेण्यात आला. 127 वर्षाची वैभवशाली परंपरा असलेला हा गणेशोत्सव यंदा प्रथमच मुख्य मंदिरात होणार आहे.गणेशभक्त आणि नागरिकांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram