Bharat biotech | भारत बायोटेकच्या लसीची आज नागपुरात दुसरी ट्रायल, 55स्वयंसेवकांना लसीचा दुसरा डोस

Continues below advertisement

भारत बायोटेकच्या co-vaccine चा दुसरा डोज आज नागपुरात दिला गेला. 14 दिवसांपूर्वी नागपुरातील ज्या 55 स्वयंसेवकांना पहिला डोस देण्यात आला होता त्यांना आज दुसरा व अंतिम डोस दिला गेला. नागपूरच्या डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांच्या मार्गदर्शनात हे vaccine दिलं जात असून पहिला डोस घेतलेल्या कोणत्याही स्वयंसेवकाला काहीही त्रास झालेलं नसल्याचे डॉ. गिल्लूरकर यांचं म्हणणं आहे. 

आज दुसरा डोस देताना या सर्व स्वयंसेवकांचे रक्ताचे नमुने ही घेतले जात असून पुढील दोन तीन दिवसात त्यांच्या रक्ताची चाचणी करत vaccine मुळे त्यांच्या शरीरात किती प्रमाणात antibodies तयार होत आहे हे तपासले जाणार आहे. पहिला डोस घेतलेल्या सर्व स्वयंसेवकांचे आरोग्य चांगले असून ते त्यांचे नियमित काम करत आहेत. जर त्यांच्या रक्ताच्या चाचणीत antibodies चांगल्या प्रमाणात मिळाल्या तर नक्कीच भारताची covaccine योग्य मार्गावर असल्याचे सिद्ध होईल असे डॉ गिल्लूरकर म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram