Maharashtra Monsoon 2022 : महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट्स एका क्लिकवर

भंडारा जिल्ह्यात गंभीर पूरस्थिती निर्माण झालीय... भंडाऱ्याची जीवनदायिनी मानली जाणाऱ्या वैनगंगा नदीच्या पातळीत मोठी वाढ झालीय. त्यामुळे भंडारा शहराला पुराचा वेढा बसलाय... टाकली- खमाटा इथं पुराचे पाणी अडीच फुटावर आल्याने भंडारा-तुमसर राज्यमार्ग बंद झालाय... शहराच्या विविध भागात पुराचं पाणी शिरलंय.. त्यामुळे प्रशासनाने जवळपास दीडशे कुटुंबाचं सुरक्षितस्थळी स्थलांतर केलंय... गोसीखुर्द धरणाचे ३३ दरवाजे अडीच मीटरने उघडण्यात आले असून १५ हजार १८० क्यूसेकनं विसर्ग सुरु आहे. विशेष म्हणजे २०२०नंतर पुन्हा गंभीर पूरस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय... 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola