Maharashtra Monsoon : गोसीखुर्द धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग, गावांना सतर्कतेचा इशारा
गडचिरोली/भंडारा चंद्रपूर – या तीन जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती अजूनही कायम आहे. गोसीखुर्द धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग अजूनही सुरू आहे. त्यामुळे येत्या काळात पुराच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क असून गडचिरोली भंडारा आणि चंद्रपूर या तीन जिल्ह्यात अनेक मार्ग अद्यापही बंद अवस्थेत आहे तर भांडार शहरा सह जिल्ह्यांमधून अनेक लोकांना रेस्क्यू करून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.