Bhandara Flood Damage | भंडाऱ्यातील इटान गावात पुरामुळे अनेक घरं उध्वस्त,अद्याप कोणतीही सरकारी मदत नाही, गावकऱ्यांना अश्रू अनावर
पूर्व विदर्भातील पुराचे भयावह चित्र भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील इटान गावात दिसून येतंय. गावाच्या शेजारून वाहणाऱ्या वैनगंगा नदीचा पूर ओसरून 4 दिवस उलटले तरी गावात चिखलाचे साम्राज्य आणि पडक्या घरांचे अवशेष अशी विदारक अवस्था पाहायला मिळत आहे. आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी इटान गावात जाऊन पाहणी केली तेव्हा गावकऱ्यांनी त्यांच्या समोर व्यथा मांडत पूर परिस्थितीनंतर प्रशासनिक दुर्लक्षाचा पाढाच वाचला. चार दिवसानंतर ही अर्धे गाव मंदिर, पोस्ट ऑफिस आणि बौद्ध विहाराच्या छतावर दिवस काढण्यास मजबूत आहे.