Latur Corona Kit | लातूरमध्ये आठवडाभरापासून कोरोना चाचणी किट मिळेनात, कोरोनाबद्दल हलगर्जीपणा
Continues below advertisement
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला त्याला आता सहा महिने पूर्ण झाले. पण अजूनही ज्याला मूलभूत सुविधा म्हणतात अशी व्यवस्थाही उभी राहीलेली नाही. बऱ्याच जिल्ह्यात ऑक्सिजन टॅंक नाहीत. रेमडेसवीर सारखे औषध मिळत नाही. डॉक्टर, नर्स नाहीत. खाजगी दवाखान्यात उपचार मिळत नाहीत. आता तर तर शासनाने टेस्टींगलाच हात अखडता घेतला आहे. जसे राज्याचे आरोग्य शिक्षण मंत्री असलेल्या अमित देशमूख यांच्या लातूर महापालिकेकडे २७ तारखेपासून आर टी पी सी आर कीट उपलब्ध नव्हते.
Continues below advertisement