Bhandara Unseasonal Rain : भंडाऱ्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, धान्याला योग्य दर मिळणार का?

Continues below advertisement

बदलत्या हवामानामुळे राज्यातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून अनेक संकटांचा सामना करतायत. गेल्या काही दिवसांपासून बळीराजावर अस्मानी संकट कोसळलंय.काल भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. सातही तालुक्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. तसंच वेळेत धान खरेदी न झाल्यानं शेतकऱ्यांनी त्यांचा धान तुमसर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डमध्ये विक्रीसाठी आणून ठेवलेत. मात्र, काल आलेल्या पावसात मार्केट यार्डमध्ये उघड्यावरील धान ओले झालेत. त्यामुळे या धानाला योग्य दर मिळेल का असा सवाल आता विचारला जातोय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram