Bhandara Pollution : भंडाऱ्यात उडणाऱ्या धुळीनं हवेची गुणवत्ता बिघडली, नागरिकांना विविध आजार

Continues below advertisement

भंडाऱ्यात उडणाऱ्या धुळीनं हवेची गुणवत्ता बिघडली,  धुळीचा नागरिकांच्या नागरिकांच्या विपरित परिणाम. या महामार्गाची तातडीनं दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. 

भंडारा शहरानजीक सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील बायपासचं काम आणि त्यावर टाकण्यात येणाऱ्या फ्लाय ऐश ची उडणारी धूळ यामुळं मागील अनेक दिवसांपासून भंडारा शहरातील हवेतील गुणवत्ता बिघडली आहे. भंडारा शहरातून मध्यप्रदेशकडं जाणारी जड वाहतूक जुन्या राष्ट्रीय महामार्गावरून वळविण्यात आली आहे. हा रस्ता म्हणजे इथून धावणाऱ्या वाहनांना बघितल्यावर लाईव्ह सर्कस बघतोय की काय, असा भास होतोय. रस्त्यावरुन जड वाहनं जाताच धुळीचा अक्षरक्ष: धुवार उडतो. आणि या धुळीत सामोरचा व्यक्ती, वा वाहनही दिसेनासा होतोय. एवढी धूळ उडतेय भंडारा शहरातून मध्यप्रदेशकडं जाणाऱ्या जुन्या राष्ट्रीय महामार्गाच्या बायपासवर....ही धूळ सरळ नागरिकांच्या तोंडावाटे शरीरात जात असल्यानं नागरिकांना विविध आजाराला सामोरं जावं लागतं आहे. या महामार्गावर भाजीपाल्याचा मोठा बाजार, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि अन्य शासकीय कार्यालयासह रहिवासी वस्ती असल्यानं उडणाऱ्या धुळीचा विपरीत परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतोय. या महामार्गाची तातडीनं दुरुस्ती करून नागरिकांना नागरी सुविधा प्रशासनानं उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आता होत आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram