Bhandara Hearing Loss due to DJ : भंडाऱ्यातील युवकाने डीजेच्या नादात गमावले कान
Continues below advertisement
तुम्हाला डीजेच्या तालावर नाचायला आवडत का? मग एक काम करा, भंडाऱ्यातील नितीन लिल्हारे या युवकाचा अनुभव ऐकाच... घडलं असं की, मोहाडी तालुक्यातील सालई खुर्दमधील नितीन बहिरा झालाय... नितीनच्या कुटुंबात मार्चमध्ये एक लग्न होतं... विवाहात तो डीजेच्या तालावर मनसोक्त बेभान होऊन नाचला... डीजेचा आवाज 140 डेसिबलपेक्षा जास्त होता.... नाचताना नितीनला फार काही जाणवलं नाही... पण रात्री कानात डीजेचा आवाज घुमत असल्याचं जाणवत होतं... काही दिवस हा त्रास सहन करूनही तो डॉक्टरांकडे गेला नाही... अखेर ऐकू येणं बंद झाल्यानंतर त्याने डॉक्टरांकडे धाव घेतली... तिथं डॉक्टरांचं निदान ऐकून त्याला जबर धक्का बसला कारण तो बहिरा झाला होता...
Continues below advertisement